Monday, August 24, 2015

रात्रीचे चांदणे
दिवसा अजून शिल्लक आहे
विसावा कुठे मिळाला नाही तरी चालेल!

या वार्याच्या झुळुकेनी
अलगद उचलून धरले आहे
सारे काही आता उधळून गेले तरी चालेल!

वाहणे हाच जणू
आता धर्म आहे
दिशाभूल आता झाली तरी चालेल!

तुझ्या आठवणीचे धुके
दाट होता, वाट दिसेनाशी होई
आता घरी परतलो नाही तरी चालेल!

आता कशाची भिती
मी माझ्यात आसा उरलो तरी किती
तुझे दर्शन झाले नाही तरी चालेल!

Wednesday, August 19, 2015

आहे खरे
सांगायचे खूप काही
बोलण्यास मात्र
आता न उरे
नावही कधी मज
माझे न स्मरे
मन नुसतेच बावरलेले

नयनांत गुंफुनी
श्वास माझे
प्राण हरवले!
अडकलेल्या श्वासांना
भाषेचे,
शब्द गवसले नाही!

आज घननिळ्या नभानी
धरतीला वाहिले सर्वकाही
थबकलेल्या मला
एक आश्रूही वाहता आला नाही
गहिवरून उठलेल्या
प्राणांना
बुडण्याची सोय नाही


Friday, August 7, 2015

चार थेंबांचे
निमित्त साधून
मातीलाही गंध फुटला
आठवणींचा घन
मानाच्या आंगणात
भान हरपून बरसला!

अशा अवेळी पावसाने
न जाणो
काय वाहून नेले
मला मात्र
तेच आभाळ
पुन्हा नव्याने
स्पष्ट दिसू लागले!

Thursday, August 6, 2015

The ancient tree
bends eagerly
Over the river
And drips through
Leaves that fall
 of their own
And the ones
that are blown

With a sudden gush of wind

There..
Sit with me
catching silently
an occasional word
That I drop helplessly
And watch it
Muddle up
the mute reflections
Thrown by your eye!